Tiger Shroff  Pudhari
मुंबई

Tiger Shroff Juhu Firing Case: टायगर गोळीबार प्रकरणात सूत्रधार अनिल पंडितच्या भावजयीला कोठडी

सुनेहा पंडित हिला कर्नालमधून अटक; विशेष मोक्का न्यायालयाकडून १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने १३व्या आरोपीला अटक केली आहे. सुनेहा पंडित असे या महिलेचे नाव असून ती या प्रकरणातील कथित सूत्रधार अनिल पंडित याची भावजय आहे.

तिला हरियाणातील कर्नाल येथून १ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. मंगळवारी (३ नोव्हेंबर) विशेष मोक्का न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अभिषेक पंडित हा अनिल पंडितचा भाऊ असून तो अन्य टोळ्यांचेही व्यवहार सांभाळत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गोळीबार प्रकरणातील आरोपींना ठरावीक कोड देण्यात आले होते. या कोडच्या माध्यमातून त्यांना पैसे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

या पैशांचा स्रोत, परदेशातून झालेल्या व्यवहारांचे स्वरूप आणि सुनेहाची नेमकी भूमिका याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली. कथित सूत्रधार अनिल पंडित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT