Tiger Shroff Firing Case Pudhari
मुंबई

Tiger Shroff Firing Case : फरार अभिषेक पंडितविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी!

अभिषेक हा कथित सूत्रधार अनिल पंडित याचा भाऊ असून, गोळीबार करणाऱ्या आरोपींना आर्थिक मदत पुरविण्यात त्याची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी अभिषेक पंडित याच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले आहे.

अभिषेक हा कथित सूत्रधार अनिल पंडित याचा भाऊ असून, गोळीबार करणाऱ्या आरोपींना आर्थिक मदत पुरविण्यात त्याची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. अभिषेकला पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक हरियाणातील कर्नाल येथे गेले होते. मात्र, पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच तो पसार झाला.

या प्रकरणात पोलिसांनी अभिषेकची पत्नी सुनेहा पंडित हिला अटक केली आहे. ती पतीच्या नावावरील बँक खाते चालवत होती आणि त्याच्या सांगण्यावरून पैसे पाठवत होती, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणातील ती १३ वी अटक आहे. १६ नोव्हेंबर रोजी विशेष मकोका न्यायालयाने तिला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

४७ लाखांच्या व्यवहारांची चौकशी

पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०२२ ते ३० जुलै २०२४ या काळात सुमारे ४७.२३ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात आढळले आहे. यातील ५७ हजार रुपये गोळीबारानंतर पळून जाण्यासाठी वापरलेल्या दुचाकीच्या खरेदीसाठी दिल्याचा संशय आहे. अभिषेकच्या परदेशातील क्रिप्टोकरन्सी खात्याचाही पोलीस तपास करत आहेत. या खात्यात खंडणीचे पैसे जमा होत होते आणि नंतर ते भारतातील बँक खात्यात पाठवले जात होते, असा पोलिसांचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT