पुढारी ऑनलाईन डेस्क : जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस ठाणे हद्दीतील आन्वा गावात एटीएसच्या पथकाची कारवाई केली आहे. यास कारवाईमध्ये 3 बांगलादेशींना ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांकडून कळाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार याठिकाणी बांगलादेशी बेकायदेशीर रित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गुप्त कारवाई करून एटीएसने बांगलादेशी असलेल्या 3 संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले तिघे बांगलादेशी रोहिंग्या असल्याची माहिती समोर आली आहे.