मुंबई

Weather Forecast| बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. परंतु गेल्या एक आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. परंतु बुधवार १६ जून पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Forecast) वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील 'X' पोस्ट पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी केली आहे.

डॉ. के. एस होसाळीकर यांनी पुढे म्हटले आहे की, "राज्यातील पश्चिम किनारपट्टी, कोकण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये बुधवार 19 जून ते शनिवार 22 जून दरम्यान पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे". तसेच पुढील काही दिवसांत पूर्वोत्तर भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)

13 जून ते 11 जुलै या कालावधीत 4 आठवड्यांसाठी देशांतील विविध भागात विसंगत पावसाचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

SCROLL FOR NEXT