मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर स्‍पेलिंग मिस्‍टेक, नावातच झाली चूक, महाविद्यालयांची तक्रार File Photo
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर स्‍पेलिंग मिस्‍टेक, नावातच झाली चूक, महाविद्यालयांची तक्रार

महाविद्यालयांनी संबंधित प्रमाणपत्र विद्यापीठाकडे केली परत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रातील स्‍पेलिंगमध्ये चूक झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई विद्‍यापीठाच्या लोगोतील स्‍पेलिंगमध्ये चूक झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असवलेल्‍या विद्‍यापीठाच्या नावातच स्‍पेलिंग मिस्‍टेक झाली आहे. Mumbai ऐवजी Mumabai असा उल्‍लेख करण्यात आल्‍याचं समोर आलं आहे. ही गोष्‍ट महाविद्यालयाच्या लक्षात आल्‍यानंतर संबंधित महाविद्यालयांनी याबाबतची तक्रार विद्यापीठाकडे केली आहे. मुंबईतील काही महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी केल्‍यानंतर ज्या प्रमाणपत्रांवर मुंबई विद्यापीठाचे स्पेलिंग चुकलेले आहे असे प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयांनी परत केले आहे.

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांच्या स्पेलिंगमध्ये याआधीही चुका केल्‍या आहेत, मात्र मुंबई युनिव्हर्सिटी लोगोतील नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र बदलून देण्याची मागणी महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. मुंबई युनिव्हर्सिटी च्या नावाचे स्पेलिंग University of Mumabai केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या वेळी मुंबई विद्यापीठाने दिलेले प्रमाणपत्र बोगस ठरवलं जाईल अशी भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT