Crude Oil Theft News : जेएनपीएच्या वाहिनीला टॅपिंग करून क्रूड तेलाची चोरी File Photo
मुंबई

Crude Oil Theft News : जेएनपीएच्या वाहिनीला टॅपिंग करून क्रूड तेलाची चोरी

नवी मुंबई क्राईम ब्रँचची कारवाई, दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Theft of crude oil by tapping JNPA's pipeline

कोप्रोली-उरण : पंकज ठाकूर

उरणच्या न्हावा शेवा बंदर विभागातून क्रुड तेल वाहून नेणार्‍या तेलवाहिन्यांना छिद्र पाडून त्यातून इंधनाची चोरी केल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चने सोनारी गावातील दोघांची गठडी वळली आहे. तेजस राजेश म्हात्रे आणि सत्यम महेश तांडेल अशी अटक केलेल्यांची नावे समोर आली आहेत. न्हावा शेवा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच कारवाई करेपर्यंत न्हावा शेवा पोलिसांना मात्र कानोकानी खबर नव्हती, याबद्दल या ठिकाणी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने मुसक्या आवळताच या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून नवी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी संजय रेड्डी याबाबतचा अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने मुसक्या आवळताच या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून नवी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी संजय रेड्डी याबाबतचा अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

काही वर्षांपूर्वी करळ पुलाच्या दक्षिण बाजूकडे देखील अशाच प्रकारे टॅप मारून त्याला पाईप जोडून तो वरती झुडपात काढण्यात आला होता. त्या पाईपाला प्लास्टिक पाईप जोडून त्याद्वारे अशाच प्रकारे थेट टँकरमध्ये इंधन भरून चोरी केली जात असल्याचे प्रकरण उघड झाले होते. मात्र त्यात कोणीही आरोपी अटक करण्यात आला नव्हता. त्या प्रकरणाशी मिळते जुळते असणार्‍या या प्रकरणात आरोपींनी न्हावा शेवा बंदरातून तेल वाहून नेणार्‍या पाईपलाईनलाच थेट छिद्र पाडून त्यातून इंधन चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांची गठडी वळली असून सध्या हे दोघे ही पोलीस कस्टडीत आहेत. मात्र या तेल चोरांनी मागील किती महिन्यांपासून ही तेल चोरी केली , त्यांनी असे चोरलेले तेल कुणाला विकले, त्यातून किती नेमकी उलाढाल झाली, न्हावा शेवा पोलिसांना या प्रकरणाची कानोकानही खबर असे अनेक प्रश्न या निमित्ताने अनुत्तरीत आहे. दरम्यान, तपास अधिकारी रेड्डी यांनी त्यांचा भ्रमणध्वनी न उचलल्यामुळे या बाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही.

तेलवाहू पाईपलाईन उघड्यावरच जेएनपीएमधील क्रूड तेलाच्या जहाजे लागण्याच्या ठिकाणापासून ते गणेश बँझो प्लास्ट या रिलायन्स या ठिकाणी ऑयल लाईन जोडल्या आहेत हे अंतर पोर्टपासून साधारण दिड ते दोन किमी अंतरावर आहे.तेथे हे तेल नेले जाते.

याच दरम्यान तेलवाहिनीला छिद्रे पाडून तेल चोरीला गेल्याचे उघड झालेले आहे. मात्र ती बंदिस्त नसून उघड्यावरच असल्याने अशा चोरीच्या घटना घडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT