मुंबई

मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक नॅककडून अ++ श्रेणी आणि ३.६५ सीजीपीए गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापीठास वर्ग-१ ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे मुंबई विद्यापीठात विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होणार आहे.

आयोगाचा हा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठास आता युजीसीच्या परवानगी सुलभतेसह नवीन अभ्यासक्रम, नवीन विभाग, नवीन कँपसेस, नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतील. तसेच आवश्यकतेनुसार स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गरजा ओळखून नाविन्यतेच्या क्षेत्रात पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठास सुरु करता येतील अशी माहिती कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT