Mumbai News : दहिसर पूर्वेतील स्‍कायवॉकचे झाले विद्रुपीकरण! File Photo
मुंबई

Mumbai News : दहिसर पूर्वेतील स्‍कायवॉकचे झाले विद्रुपीकरण!

फेरीवाल्यांच्या दोर्‍यांमुळे स्थानिकांसह वाहनचालक त्रस्‍त, कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

The skywalk in Dahisar east has been disfigured!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या जटील बनली आहे. महानगरातील रेल्वे स्थानकांबाहेर तर फेरीवाल्यांचा हैदोस दिसून येतो. दहिसर पूर्वेकडील रेल्वे स्थानकाला जोडलेल्या स्कायवॉकचे तर अवैध फेरीवाल्यांनी विद्रुपीकरण केले आहे. सदर स्कायवॉकला जागोजागी दोर्‍यांचा विळखा घातलेला आहे. यामुळे स्वच्छ, सुंदर दहिसर आता विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. याचा स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मात्र दररोज त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका आर.उत्तर विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी दहिसरकरांकडून केली जाऊ लागली आहे.

दहिसर पूर्वेकडील भरुचा रोड येथील स्कायवॉक हा रेल्वे स्थानकापर्यंत आहे. मात्र स्कायवॉकच्या खांबांना आणि पत्र्याला जागोजागी फेरीवाल्यांनी दोर्‍या बांधलेल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांसह पादचारी आणि स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्दैवाने जर एखादी दोरी तुटून रस्त्यावर पडली, तर पादचार्‍यांना इजा होऊ शकते. तसेच वाहनचालकांचा अपघातही होऊ शकतो. अशी परिस्थिती असतानासुध्दा पालिका आर.उत्तर विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष का करत आहेत, असा सवाल आता दहिसरकरांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

येथील स्कायवॉकलगतच्या फेरीवाल्यांवर मागील काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. आता पुन्हा स्कायवॉकला दोर्‍या बांधल्या असतील, तर त्या काढून टाकण्यात येतील.

- नयनीश वेगुर्लेकर, सहाय्यक आयुक्त, आर.उत्तर.

पदपथालगतही दोर्‍यांचा विळखा

पदपथालगत असलेल्या कंपाऊंडलासुध्दा फेरीवाल्यांनी सोडलेले नाही, त्या पत्र्यांच्या कंपाऊंडलाही दोर्‍यांनी विळखा घातला आहे.

रेल्वे स्थानकांबाहेर दिवस-रात्र फेरीवाले

एकीकडे केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल हे उत्तर मुंबईला, उत्तम मुंबई करण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT