मुंबई : मेट्रो ३ मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याच्या दृष्टीने एकेक पाऊल पुढे टाकत आहे. मेट्रो ३ची आरडीए- सओची चाचणी नुकतीच पार पडली. यात मेट्रो गाडी ९५ किमी वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे.
एखादी ट्रेन सुरू होण्यापूर्वी 'रिसर्च डिझाइन्स अॅण्ड स्टॅण्डर्ड्स असोसिएशन'तर्फे काही चाचण्या घेतल्या जातात. याच अंतर्गत मेट्रो ३ची चाचणी घेण्यात आली. यात ९५ किमी वेगाने धावण्यात मेट्रो यशस्वी ठरली आहे. वजन वाहून नेण्याची क्षमता आणि इतर अनेक तांत्रिक चाचण्याही करण्यात आल्या. या यशस्वी चाचणीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनेही काही चाचण्या केल्या जाणार आहेत. यासाठी 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी' या पथकाला पाचारण केले जाणार आहे. मेट्रो ३ मार्गिकवर एकूण २७ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात त्यापैकी १० स्थानकांवर मेट्रो धावेल