टॅक्सीचा व्यवसाय संकटात येईल, शिवाय सध्या मुंबईत २८ लाख दुचाकी असून त्यात आणखीन भर पडून वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
या समितीने सरकारला अहवाल सादर केला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली.
मुंबई आणि आपसासच्या भागात बाईक टॅक्सीला सरकारने परवानगी दिली आहे. लवकरच या संदर्भात राज्य सरकारचा शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. या बाईक टॅक्सीमुळे शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त चालक आणि अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली होती. संघटनेने बाईक टॅक्सीला कडाडून विरोध केला होता. बाईक टॅक्सी सुरक्षित नाहीत. त्यांच्या चालवण्यावर बंधन नसते. चालकाच्या विश्वासार्हतेवरही संघटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बाइक टॅक्सीमुळे आमच्या व्यवसायाला धोका असून ते सुरक्षित नसल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे
एकट्या मुंबईत २८ लाख दुचाकी रजिस्टर आहेत. द्याकी चालकांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. त्यात आता बाईक टॅक्सीची भर पडल्यास वाहतूककोंडीत अजून भर पडण्याची शक्यता आहे. ऑटोरिक्षा व चारचाकी टॅक्सी चालक संघटनांचा विरोध असल्याने अनेक राज्यांनी बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली नव्हती.
मुक्त रिक्षा परवाने धोरण राज्य सरकारने आखले. आता रिक्षा चालकांच्या पोटावर पाय देत मोठ्या कंपन्यांकरिता राज्य सरकारने बाईक टॅक्सीला परवानगी दिली. परंतु हे धोकादायक असल्याने दिल्ली सरकारप्रमाणे राज्य सरकार- नेही यावर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
बाईक टॅक्सीचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, प्रवासी जखमी झाला किंवा मृत्यू पावला तर नुकसान भरपाई कोण देणार, चालकांच्या वेगावर नियंत्रण कोण ठेवणार, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?
भारतात गोवा राज्यात बाईक टॅक्सीला प्रथम परवानगी देण्यात आली. गोव्यात पर्यटकांची संख्या जास्त आहे. येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अरुंद रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे येथे बाईक टॅक्सीला पर्यटक पसंती देतात.