आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अवतरला आणि स्व. दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने चाचणी उड्डाण घेतले.  D.B.Patil Navi Mumbai International Airport
मुंबई

दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावले पहिले विमान

पुढारी वृत्तसेवा

दीपक घोसाळकर

कळंबोली : संपूर्ण महामुंबई प्रदेश ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण बुधवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अवतरला आणि स्व. दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने चाचणी उड्डाण घेतले.

दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे छोटे विमान बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता उतरले आणि एअरपोर्ट सिग्नल सिस्टीमची चाचणी घेत याच विमानाने पुन्हा झेप घेतली. महामुंबई प्रदेशाला विमानाचे कौतुक नाही. रोज असंख्य विमाने डोक्यावरील आकाशातून घोंगावत जातात-येतात

मात्र, दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावले पहिले विमान नवी मुंबई विमानतळ अजून बांधून पूर्ण झालेले नसताना तिथल्या धावपट्टीवर उतरलेल्या आणि पुन्हा उडालेल्या या छोट्या विमानाचे नवी मुंबईकरांना मोठे कौतुक होते. खास करून पनवेल शहरावरून अगदी 100 ते 150 फूट उंची वरून उडालेले हे विमान पाहण्यासाठी ठिकठिकाणी लोक माना वर करून उभे होते. विमानतळावरून झेप घेतल्यानंतर पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरावर या विमानाने घिरट्या घातल्या. त्यात ही उड्डाणाची चाचणी असून लवकरच विमानतळ सुरू होणार याची खात्री पटल्याने नवी मुंबईकर खुश झाले आहेत.

31 मार्च 2025 पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याचा मानस केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने आधीच जाहीर केला आहे. विमानतळाचे कामही युद्धपातळीवर रात्रंदिवस सुरू आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असून विमानतळाच्या आजूबाजूच्या संरक्षक भिंतीही पूर्णत्वाकडे जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT