मुंबई

मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प

Shambhuraj Pachindre

[author title="सुरेखा चोपडे" image="http://"][/author]

मुंबई : जानेवारी ते मे या पाच महिन्यांत लोहमार्ग पोलिसांकडे मोबाईल चोरीच्या 4,785 घटनांची नोंद झाली आहे.त्यापैकी केवळ 1,778 गुन्ह्यांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. दिवसाला 30 ते 35 मोबाईल फोन लोकलमधून चोरीला जातात.

सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दिवसाला 65 लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळ आणि संध्याकाळी पीक अवरवेळी लोकलला जास्त गर्दी असते.याचा फायदा मोबाईल चोर घेतात. मध्य रेल्वेवरील कुर्ला व ठाणे तर पश्चिम रेल्वेवरील बोरीवली, नालासोपारा या स्थानकांत
सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना घडतात.

पीक अवर वेळी होते सर्वाधिक मोबाईल चोरी

लोकल पकडण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असतात.लोकल प्लॅटफॉर्मवर येताच प्रवासी लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी गर्दी करतात.याच 30 ते 45 सेकंदांच्या कालावधीत गर्दीचा फायदा घेत चोर प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारतात. या क्लुप्तीचा वापर मोबाईल चोर कायम करत असतात.

मोबाईल चोरीची एफआयआर नोंदविणे बंधनकारक

सर्व रेल्वे पोलिस ठाण्यांना चोरीच्या फोनसाठी एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. यापूर्वी फोन हरवल्यावर एफआयआर नोंदवली जात नव्हती.112 स्थानकांमधील 17 पोलिस ठाण्यांमध्ये हे अनिवार्य आहे.

परराज्यातून मोबाईल जप्त

फोन चोरीला गेल्यावर त्याचा मागोवा घेणे सोपे नसते. बहुतेक महागडे फोन काही तासांत विकून इतर राज्यांत जातात.चोरीस गेलेले
मोबाईल उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,बिहार या राज्यात सर्वाधिक ट्रेस केले जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT