Local Train Pudhari
मुंबई

Thane Kalyan Megablock: मरेचा आज ठाणे-कल्याण ब्लॉक

कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऐन गणपती उत्सवात उपनगरीय मार्गांवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी १६ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार असून ठाणे/वाशी/नेरुळ/पनवेल मार्गावरील उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

या कालावधीत मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी १५.५३ या वेळेत लोकल मुलुंड आणि कल्याण दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे उपनगरीय लोकल डाऊन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे लोकल १० मिनिटे उशिराने पोहोचतील किंवा सुटतील. तसेच या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा बंद राहणार आहेत, बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या मात्र रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT