मुंबई : आझाद मैदानात गिरणी कामगारांसाठी एकत्र आलेले जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरे.  (छाया ः दीपक साळवी)
मुंबई

Adani land allocation in Vangani Shelou : अदानीला वांगणीला पाठवा; गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्या

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी; आझाद मैदानातून राज्य सरकारवर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गिरणी कामगार,त्यांचे वारसदार यांना मुंबईत घरे देऊन त्यांना न्याय मिळवून देऊ,असे आश्वासन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुृंबई येथे बुधवारी दिले.ते गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने आझाद मैदानात केलल्या आंदोलनावेळी बोलत होते.धारावी,कुर्ला डेअरीची जागेवर गिरणी कामगारांना सरकारने घरे द्यावीत व वांगणी,शेलू याठिकाणी अदाणी ला घालावावे अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात यावे, आम्ही त्यांना भेटण्यासाठी जाणार नाही,अशी भुमिका समितीची असल्याचे यावेळी सांगितले. वांगणी शेलू नको हक्काचे घर मुंबईतच पाहिजे अशा घोषणा यावेळी गिरणी कामगार,त्यांचे वारसदार यांनी दिल्या.घरे मुंबईत द्यावीत असे फलक यावेळी आणण्यात आले होते. आंदोलनाला मुंबई,कोकण पश्चिम महाराष्ट्र येथून गिरणी कामगार व त्यांचे वारसदार मोठ्या प्रमाणात आले होते.

आंदोलनात आमदार सचिन अहिर, आमदार भास्कर जाधव, विधानपरिषद आमदार भाई जगताप,आमदार आदित्य ठाकरे,आमदार अजय चौधरी यासह खासदार अरविद सावंत,मनसे नेते बाळा नांदगावकर.गिरणी कामगार नेते बी.के.आंब्रे, उदय भट, भाकपचे प्रकाश रेड्डी ,गोविंद मोहिते, बाळ खवणेकर यांच्यासह 14 गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होते.

यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले.गिरणी कामगारांचा हा प्रश्न सभागृहात मांडला आहे.सरकारने 15 मार्च 2024 ला काढलेल्या शासन निर्णयानुसार मुंबई बाहेर गिरणी कामगारांनी घरे घेतली नाही तर त्यांना यादीतून बाहेर काढू,असे सरकार सांगत आहे.त्यांना मुंबईत घरे द्यावीत.

यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, 1982 पासून हा लढा सुरु आहे. स्वातंत्र्यानंतरच्या लढ्यात गिरणी कामगारांचे योगदान आहे.निवडणूक आली की महायुतीला गिरणी कामगारांची आठवण येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT