पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीकेश सांवत याचे अपहरण झाले असल्याची तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल झाली असून याप्रकरणी सोमवारी (दि.१०) माजी मंत्री तानाजी सांवत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याबाबत बोलताना मंत्री सांवत म्हणाले, ऋषीकेशचे आणि माझे दिवसभरात १५-२० कॉल होतात, परंतू आज आमच्यात कोणताही संपर्क झाला नाही. आम्हाला कोणतीही कल्पना न देता तो गेला असून दुपारपासून त्याचा फोन बंद लागल्याने मला त्याची काळजी वाटली. त्यानंतर मी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधत त्यांना याची माहिती दिली.
तसेच दुसऱ्याच्या गाडीने तिघेजण पुणे विमानतळावर गेले असून ऋषीकेशने स्वत:ची गाडी नेली नाही. विमान कोणत्या दिशेने गेले आहे, याची माहिती घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. ऋषीकेशसोबत त्याच्या दोन मित्रांशिवाय अनोळखी कोणीही नाही, अशीही माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी दिली.