भक्त अजिबात चिडले नाहीत, पण भक्तांची चॉईस…सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल Sushma Andhare
मुंबई

Sushma Andhare | भक्त अजिबात चिडले नाहीत, पण भक्तांची चॉईस…सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल

भक्त अजिबात चिडले नाहीत, पण भक्तांची चॉईस…सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना केलेल्या मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मारहाण होऊनही गुन्हा दाखल का नाही, असा सवाल करून हे मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. याचवेळी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. कार्यकर्त्यांवर शिंदेंच्या गुंडांकडून हल्ला होऊनही ते गप्प आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी काल (दि.३) ठाण्यात केली. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या टीकेला 'भक्तांची चॉईस किती फडतूस' असं म्हणतं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुषमा अंधारे यांनी केलेली पोस्ट वाचा त्यांच्याच शब्दांत. (Sushma Andhare)

अंधारेंची पोस्ट त्यांच्याच शब्दात

छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड, लोढा कोश्यारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत. संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडलं. त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत. पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले.

सारांश : ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

सुषमा अंधारे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय वर्तूळात या पोस्टची चर्चा होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT