Sunil Tatkare News Pudhari
मुंबई

Sunil Tatkare: अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे; सुनील तटकरे यांची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे तटकरे यांचे वक्तव्य; अमित शहा भेटीबाबतही दिले स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, ही आमची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, गरज भासल्यास पुन्हा चर्चा करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीबाबत तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्यातील मंत्री कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते.

त्यावेळी अमित शहा यांची भेट झाली असेल, तर त्यात वेगळे काही मानण्याचे कारण नाही. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे राजकीय निष्कर्ष काढणे योग्य नाही. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती संबंधित नेत्याशी बोलल्यानंतर घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेबाबत तटकरे म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. अशा घटनांमुळे मुंबई पोलिसांसमोर आव्हान निर्माण होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तातडीने चौकशीचे निर्देश दिले असून, मुंबई पोलीस तपास करत आहेत. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT