Sunetra Pawar on Ajit Pawar Pudhari
मुंबई

Sunetra Pawar on Ajit Pawar: अजित पवार यांचे कार्य अविस्मरणीय! सुनेत्रा पवार यांनी जागवल्या अजित पवार यांच्या आठवणी

आपण सर्वजण त्यांचे विचार, मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करुया.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दिवंगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी केलेले कार्य आणि योगदान विसरता येणार नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजित पवार यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. आपण सर्वजण त्यांचे विचार, मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करुया.

आज अजित पवार आपल्यात नाहीत. त्यामुळे पक्षाचा आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे.त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात, असे सांगत आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे सुनेत्रा पवार यांनी आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवा नेते खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आदींसह पक्षाचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबईत पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले. भुजबळ यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT