एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ होणार आहेत  file photo
मुंबई

ST : एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ

२५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान होणार निर्णयाची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा
सुरेखा चोपडे

मुंबई : दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ असणार आहे. वा भाडेवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे ९५० ते एक हजार कोटीचा महसूल जमा होईल. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ७० ते १००० रुपयांनी महागणार आहे.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आमजतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्टघांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते, महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते, महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ स्वस्पाची भाडेवाढ केली जाते.

यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. सध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता ही भाडेवाढ लागू असणार आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही. १० टक्के भाडेवाढीमुळे राज्यातील जनतेचा दिवाळी सणाच्या दिवसातील एसटीचा प्रवास महागणार आहे.

सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ३० कोटी रुपये होईल, त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला ९५० ते १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. सध्या महिन्याला ८५० कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT