Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : १० कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक : ६ जणांना अटक

ज्वेलर्सकडून सोने खरेदी केल्याचे तपासात उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कंपनीचे मालक असल्याचे भासवून विविध खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगून १० कोटी ४० लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना दक्षिण सायबर पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर दरेभान ठोके, बिरेंद्रकुमार चंद्रमा भगत, रंजनकुमार राजू खरवार, विकास उपेंद्र बिंद, वंश सुमित मनोचा, फैयाज शब्बीर हुसेन आलम अशी त्या सहा जणांची नावे आहेत. या टोळीने फसवणुकीच्या रकमेतून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली काही ज्वेलर्सकडून सोने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ३ जून ते १५ जून या काळात तक्रारदार याना त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. त्या मेसेज आलेल्या नंबरवर त्याच्या मालकाचा फोटो होता. ठगाने ते मालक असल्याचे भासवले. मिटिंग मध्ये व्यस्त असल्याचे भासवून त्याना विविध खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यावर विश्वास ठेऊन एकूण १० कोटी ४० लाख रुपये ७१ हजार रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

घडल्याप्रकरणी त्याने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहायक आयुक्त इरफान शेख याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहायक निरीक्षक त्रिमुखे, ईशान खरोटे, रामदास गोपाळ आदीच्या पथकाने तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे गेले. फसवणुकी पैकी ३१ लाख रुपये रक्कम ज्ञानेश्वर ठोकेच्या बँक खात्यात गेली होती. त्याला पोलिसांनी जालना येथून अटक केली. त्याने त्याचे सिमकार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक पासबुक एकाला दिले.

तपासादरम्यान पोलिसाना बिरेंद्रकुमार ची माहिती मिळाली. त्याच्या खात्यात ९ लाख ६० हजार रुपये जमा झाले होते. त्याला बिहार येथून पोलिसांनी अटक केली. त्याने आपले खाते रंजनकुमार खरवार ला दिले होते. त्याने फसवणुकीच्या पैशातून सोने खरेदी केले होते. तसेच ९ लाख ९० हजार रुपये स्वीकारणाऱ्या विकास बिंद ला देखील पोलिसांनी अटक केली. वंश मनोचा, फैयाज आलमला तिहार जेल मधून ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT