सायन उड्डाणपूल 15 जुलैपर्यंत होणार पूर्ण  pudhari photo
मुंबई

Sion flyover completion date : सायन उड्डाणपूल 15 जुलैपर्यंत होणार पूर्ण

दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी मार्ग पूर्ण झाला असून येत्या पंधरवड्यात तो खुला होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. पादचाऱ्यांना पूर्व - पश्चिम आवागमनासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी मार्ग पूर्ण झाला असून येत्या पंधरवड्यात तो खुला होणार आहे. तसेच उर्वरित एक उड्डाणपूलासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून 15 जुलै पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग तसेच पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्गांचेे काम बृहन्मुंबई महापालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी होणार आहे.

पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्ध व्हावा असे नियोजन करावे. पश्चिमेकडील कामाचे 4 टप्पे असून या चारही टप्प्यांच्या पूर्णत्वाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीतच, पश्चिम बाजूची सर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण केली जातील.

रेल्वे प्रशासनाकडून 31 मे पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्त्याचा ताबा महापालिकेला मिळणे अपेक्षित असल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी काही कालावधी आवश्यक आहे. त्याचा विचार करता या पुलाची सर्व कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT