Shrikant Shinde On 500 Cr pudhari
मुंबई

Shrikant Shinde On 500 Cr: आम्ही देखील ५०० कोटी रूपये एकत्र कसे दिसत असतील याची चर्चा करत होतो.. श्रीकांत शिंदेचा मिश्किल टोला

Anirudha Sankpal

Shrikant Shinde On 500 Cr: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर दाखवली. त्यात भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडून जरांगेंकडे ५०० कोटी रूपये पोहचवल्याचा दावा करण्यात आला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मिश्किल टोला लगावत त्या ५०० कोटींचा मी देखील शोध घेत आहे असा दावा केला.

माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, 'जरांगेंना पडलेला प्रश्न मला देखील पडला आहे. 500 कोटी बाबत मी देखील शोध घेतोय. 500 कोटी एकत्र कसे दिसतील हीच चर्चा आम्ही करत होतो.'

ज्यासोबत पैसे पाठवले तो माझ्यापर्यंत पोहचलाच नाही. तो गेला कुठे याचा मी शोध घेतोय. असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला.

थोडी थट्टा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल. असे म्हणत दोन दिवस मी देखील ते पैसे शोधायला चालला आहे. आमचा रिसर्च सुरू आहे. आम्ही देखील ५०० रूपये एकत्र कसे दिसतील अन् त्यासाठी किती गाड्या लागतील याचा शोध घेत आहोत. तुम्हाला देखील काही कळालं तर सांगा असा टोला लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT