मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सोमवारी शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण केले. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. pudhari photo
मुंबई

Shivaji Park Gymkhana reopens : ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना दीड वर्षांनंतर खुला

सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते लोकार्पण!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नुतनीकरण करण्यात आलेला दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना दीड वर्षांनंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सभासदांसाठी खुला करण्यात आला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर तीन हजारांहून अधिक सदस्यांसाठी जिमखान्याचे दरवाजे खुले झाले.

लोकार्पण झाल्यानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला. सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर, भाजप नेते आशिष शेलार, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, महेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर तसेच जिमखान्याचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

1909 साली स्थापन झालेला शिवाजी पार्क जिमखाना मुंबईतील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. नुतनीकरणामुळे हा जिमखाना आता मुंबईकरांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र बनणार आहे. या जिमखान्याला भारतीय क्रिकेटची नर्सरी मानले जात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही येथे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

नुतनीकरणानंतर शिवाजी पार्क जिमखाना व्यवस्थापनाने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूम आणि शौचालये उपलब्ध दिले. याचे तशंडूलकर यांनी तोड भरून कौतुक केले.देशातील प्रत्येक ठिकाणी ही सुविधा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

सचिन-राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन कार्यक्रम संस्मरणीय ठरला. मात्र, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा मुद्दा ठरली. शिवाजी पार्कशी त्यांचा जवळचा संबंध लक्षात घेता त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या.

माझं बालपण मी इथंच घालवलं...

सचिन तेंडूलकर यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “मला आठवतं, मी माझं बालपण इथेच घालवलं, असे त्यांनी भावूक उद्गार काढले. तसेच नूतनीकरणात योगदान देणार्‍या सर्वांचे आभार मानले. “या जिमखान्याला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आणण्यासाठी अनेक लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. राज ठाकरे यांची या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केवळ आवश्यक परवानग्या मिळवण्यासच मदत केली नाही, तर नव्या डिझाइनमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते,“ असे ते म्हणाले.

  • 1909 मध्ये न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब म्हणून या क्लबची स्थापना झाली.

  • 1931 मध्ये सध्याच्या क्लबहाऊसचे उद्घाटन झाले.

  • 1942 पर्यंत जिमखान्याचे क्षेत्रफळ 19,000 चौरस यार्डपर्यंत वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT