पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे उपनेते विजय नहाटा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. असेही नमुद करण्यात आलेले आहे.