मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मुंबई

शक्‍तिपीठ महामार्गाला कोल्‍हापूरातून विरोधः चर्चेतून मार्ग काढू

Maharashtra CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्यात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. त्‍याचपद्धतीने शक्‍तिपीठ महामार्ग ही विकासाचे पर्व घेऊन येणार आहे. या महार्गाबाबत सांगलीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. पण या महामार्गाला कोल्‍हापूरात मोठा विरोध आहे. पण जिथे विरोध तिथे चर्चा करुन मार्ग काढणार, शेतकऱ्यांचा विरोध पत्‍करुन हा महामार्ग पुढे नेणार नाही. कोल्‍हापूरसाठी पर्यायी मार्ग शोधून काढू असे महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले. शपथविधीनंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते म्‍हणाले समृधी महामार्गामुळे मराठवाठा विकसीत झाला पुण्यासारखाच इंडस्‍ट्रिजचा विस्‍तार तिकडे होत आहे. त्‍याचप्रमाणे शक्‍तिपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी फायद्याचा ठरेल.

विकास प्रकल्‍पांना देणार गती

नदी जोड प्रकल्‍पाचे काम सुरु करण्याचे नियोजन आहे, सौरउर्जा प्रकल्‍पातून २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट विज निर्माण करण्याचे उद्दीष्‍ट आहे. त्‍याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून अखंडितपणे दिवसा विज मिळणार आहे. जलयुक्‍त शिवार योजनेचे बळकटीकरण, मूलभूत निर्णयावर अधिक भर देणार आहे. असे सांगितले पुढे त्‍यांनी पदभार स्‍वीकारल्‍यानंतर पहिली सही कॅन्सर रुग्णाच्या फाईलवर केल्‍याचे स्‍पष्‍ट केले. मुख्यमंत्री सहायता निधीतून पुण्यातील एका कॅन्सर रुग्‍णाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पाच लाख मंजूर केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राजकीय वातावरण चांगले ठेवणार

पुढे त्‍यांनी सांगितले की महाराष्ट्राची संस्‍कृती बदला घेण्याची नाही. मी स्‍वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्‍वीराज चव्हाण यांना फोन करुन शपथविधी समारंभाचे आमंत्रण दिले होते. हे सर्व नेते त्‍यांच्या कार्यबाहूल्‍यामूळे उपस्‍थ्‍ति राहू शकले नाहीत पण त्‍यांनी फोनवरच मला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्‍यातील राजकीय संवाद संपला नाही असेही त्‍यांनी सांगितले.

पुढे त्‍यांनी विविध मुद्यांवर भाष्‍य केले, मराठा समाजाला न्याय देणार असल्‍याचे सांगितले तसेच. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मान्य करणार त्‍यांनी विरोधी पक्ष नेता देण्याचे ठरवले तर आम्‍ही तो मान्य करणार आहे. शक्‍ती कायद्यात आवश्यकतेनुसार व केंद्राच्या सुचनेनूसार बदल करण्यात येईल, शेतकरी कर्जमाफी संदर्भात विचार करु असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT