डोळखांब (ठाणे) : दिनेश कांबळे
शहापूर व मुरबाड तालुक्याचे सरहद्दीवर शाई नदीवर प्रस्तावित असलेल्या शाई धरणाचे संघर्षाचे फटाके दिवाळी नंतर फुटणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. तर शेतकऱ्यांचा विरोध काय असतो हे शासनाला लवकरच कळेल अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.
शहापूर तसेच मुरबाड तालुक्याचे सरहद्दीवर ढाढरे ग्रामपंचायत हद्दीतील शाई नदी पात्रावर शाई धरण बांधण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. परंतु या धरणाचे कामासाठी येथील शाई धरण विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा तिव्र विरोध असल्याचे पहायला मिळते. याबाबतचा संघर्ष व शेतकऱ्यांचा विरोध दिवाळीनंतर पहायला मिळणार आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू असल्याने समितीच्या गाव बैठका तात्पुरत्या स्थगित आहेत. त्यामुळे शेतीची कामे आटोपली की लवकरच बैठकांचे तसेच मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली असुन पुढील संघर्षाचे धोरण लवकरच ठरणार आहे.
शाई धरणाचे काम गेली अनेक वर्ष रखडले असुन या धरणाचे कामाला येथील शेतकरी तसेच काही आदीवासी गटांनी तिव्र विरोध दर्षविला असल्याने धरणाचे काम रखडले असल्याचे सांगितले जाते. तर मरण चालेल पण धरण नको असा येथील शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.
कारण या कामामुळे येथील ५४ गाव पाड्यातील पंधरा हजाराचे आसपास कुटुंबाच्या सात पिढ्या विस्थापित होणार आहेत. त्यांचे मुलाबाळांचे शिक्षणाचा, नोकरीचा, पुनर्वसनाचा, जमिन संपादन व मोबदल्याचा प्रश्नही गंभिर आहे त्यामुळे चारही बाजुने शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. नाती गोती दुरावणार आहेत. म्हणून हे धरणच नको असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम
ठाणे शहराची भविष्यातील तहान भागविण्यासाठी होवु घातलेल्या या धरणासाठी ठाणे मनपाचे अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. या कामामध्ये ४९४ हेक्टर वन जमिन, २३९७ हेक्टर खाजगी जमिन, लागणार असुन पाच गावे पुर्ण पाण्याखाली जाणार आहेत. तर १८ गावांचे पुनर्वसन आणी ६ गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहे.
अनेक वेळा शासन या धरणाचे कामासाठी विचाराधिण असतांना शेतकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असुन यापुढे ही या कामासाठी शेतकरी आणी शासन यांचे मध्ये संघर्षाची ठिणगी पडत रहाणार असल्याचे दिसते. परंतु दिवाळी नंतर हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.