पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानपाठोपाठ आता शाहरुख खानलाही (Shahrukh Khan Threat) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांचे पथक छत्तीसगड रायपूरला पोहोचले आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी शाहरूख खानची सुरक्षा वाढवली आहे.
याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, ५ नोव्हेंबररोजी दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. ५० लाखांची मागणी करून पैसे न दिल्यास शाहरुख खानला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली. धमकीचा फोन करणाऱ्याने सांगितले की, मी शाहरुख खानला मारेन, तेव्हा फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता, मला काही फरक पडत नाही. असे सांगितले.
शाहरुख खान मन्नतमध्ये राहणारा माणूस आहे, जर त्याने मला ५० लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला मारून टाकेन. पोलिसांनी त्याला असे का बोलत आहे. आणि तुझे नाव काय आहे, असे विचारले असता तो म्हणाला, तुम्हाला लिहायचे असेल, तर माझे नाव हिंदुस्थानी लिहा.