मुंबई : घराबाहेरील ड्रममधून पाणी भरत असताना चौदा वर्षीय मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या तरुणाने तिला त्याच्या घरी आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच 19 वर्षीय आरोपी तरुणाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्या शेजारीच आरोपी तरुण राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. पाच दिवसांपूर्वी ती घराबाहेरील ड्रममधून पाणी भरत होती. यावेळी तिथे आलेल्या आरोपीने तिचा हात पकडून त्याच्या घरी आणले आणि तिला धमकावून तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता.