Digital Arrest Scam | तब्बल 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळाप्रकरणी सातजणांना अटक File Photo
मुंबई

Digital Arrest Scam | तब्बल 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळाप्रकरणी सातजणांना अटक

साडेतीन कोटी गोठवले; मुख्य आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : तब्बल 58 कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळाप्रकरणी सातजणांना राज्य सायबर सेल पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून शेख शाहीद अब्दुल सलाम, जाफर अकबर सय्यद, अब्दुल नासीर अब्दुल करीम खुल्ली, अर्जुन फौजीराम कडवासरा, जेठाराम राहिंगा कडवासरा, इम्रान इस्माईल शेख आणि मोहम्मद नावेद शेख अशी या सातजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन कोटी विविध बँक खात्यात ‘फ्रिज’ केले असून मुख्य आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार वयोवृद्ध असून ते त्यांच्या पत्नीसोबत दक्षिण मुंबईत राहतात. त्यांचा शेअरशी संबंधित व्यवसाय होता. ऑगस्ट महिन्यात त्यांना सुब्रमण्यम आणि करण शर्मा नावाच्या दोन व्यक्तींनी कॉल केला होता. तुमच्या बँक खात्यांतून दोन कोटींचे मनी लाँडरिंग झाले असून त्याची चौकशी पूर्ण होईपयर्र्ंत तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, अशी धमकी या दोन व्यक्तींनी तक्रारदारांना दिली होती.

पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत गंडा घालणार्‍या टोळीला बेड्या

पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत अटकेच्या कारवाईची भीती दाखवून एका वृद्धाला 70 लाखांना गंडा घालणार्‍या सहाजणांच्या एका टोळीला आरएके मार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशकुमार पटेल, मुसरान कुंभार, चिराग चौधरी, अंकितकुमार शहा, वासुदेव ऊर्फ विवान वालजीभाई बारोट आणि युवराज ऊर्फ मार्को सिकरवार अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT