पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज (दि.२७) सकाळी ११ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून निघेल. आणि एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शन शनिवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.
त्यांच्या पश्चात मुलगा धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, विनय पाटील आणि मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत.