School bus drivers will be tested for alcohol every week
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार असून आठवड्यातून एकदा ड्रग्ज आणि मद्यसेवन चाचणी, प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी, सीसीटीव्ही आणि जीपीएससह सुविधा बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील सुमारे 6 हजारांहून अधिक शालेय बसेस आणि संबंधित कर्मचार्यांवर होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 16 जूनपासून सुरू होणार असून उन्हाळी सुट्टी 2 मेपासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात 23 जूनपासून सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने 13 मे रोजी कठोर आणि सर्वसमावेशक शासन निर्णय लागू केला आहे.
शाळांमध्ये सीसीटीव्हीचा वापर मुख्य प्रवेशद्वार, शौचालय परिसर, वर्ग आणि मैदान येथे बंधनकारक केला आहे. शाळेत तक्रार पेटी ठेवण्याचे आणि त्याची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बस चालक, सफाई कामगार व महिला सेविकांची चाचणी सकाळी व संध्याकाळी होणे गरजेचे आहे.
आमच्या शाळेत पीटीए प्रचंड सक्रिय असून, चालक पोलिस पडताळणीशिवाय गेटवरही येऊ शकत नाही.-सुनीता जॉर्ज, प्राचार्य, बॉम्बे स्कॉटिश
या निर्णयामुळे वाहतूक नियमांचे पालन केल्यासच विद्यार्थी वाहतूक शक्य होणार आहे.अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन
महिला बस चालकांना प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय पाऊल असून शाळांनी सुरक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करणे ही सकारात्मक पायरी आहे. -स्वाती पोपट वत्स, अध्यक्षा, अर्ली चाइल्डहूड असोसिएशनस्वाती पोपट वत्स, अध्यक्षा, अर्ली चाइल्डहूड असोसिएशन