Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari pudhari photo
मुंबई

Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari: त्याला धोतर नीट नेसता येत नाही रे तो काय... संजय राऊतांनी कोश्यारींवर चांगलाच बार काढला

संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला

Anirudha Sankpal

Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरूद्ध कडक शब्दात टीका केली. भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढा का घाबरत आहेत असे वक्तव्य केलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ज्याला धोतर नीट नेसता येत नाही रे तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय असं वक्तव्य केलं. राऊत यांनी मोदींना कोण घाबरतंय असं म्हणत राहुल गांधी यांच्या संसदेतील कालच्या भाषणाचा संदर्भ देखील दिला.

राहुल गांधींनी संसदेत...

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना पत्रकारांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी, चिडलेल्या संजय राऊत यांनी, 'अरे त्याला धोतर नीट नेसता येत नाही तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय... तुम्ही बघा त्याला समोरून, त्याचं धोतर कसं असतं ते...' असं वादग्रस्त वक्तव्य केलं.

राऊत पुढे म्हणाले, 'जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय की मोदींना घाबरू नका म्हणू, मोदींना कोण घाबरतंय. काल राहुल गांधीनी संसदेत सांगितलं आहे ना... डोळ्यात डोळे घालून अमित शहा अन् नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बोलण्याची हिंमत आमच्यात आहे. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना अमित शहा आणि पंतप्रधानांनी संसदेतून पलायन केलं.'

हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही

राऊत यांनी तुमच्या हातामध्ये एजन्सी आणि सत्ता आहे म्हणून आम्हाला सांगताय. धोतर आधी नीट नेसायला शिका आणि मग महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. यानंतर राऊत यांनी बोलताना कोश्यारींविरूद्ध एक वादग्रस्थ शब्दप्रयोगही केला.

संजय राऊत यांनी, 'भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं सांगत त्या व्यक्तीला भाजपनं पद्मभूषण पुरस्कार दिला. हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाहीये मिस्टर फडणवीस लक्षात घ्या. त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला होता.' अशी जहरी टीका देखील केली.

चंद्रपूरबाबत उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलंय

दरम्यान, चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र गटनोंदणी केली. त्यामुळं आमच्या स्थानिक नगरसेवकांनी वेगळा निर्णय घेतला. याबाबत उद्धव ठाकरेंनी स्वतः लक्ष घातलं आहे. कदाचित त्या नगरसेवकांना एकदोन दिवसात मुंबईत पाचारण करण्यात येईल. त्यानंतर काय होतं त्याची माहिती मी तुम्हाला देईन असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT