मुंबई

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच : संजय राऊत

दिनेश चोरगे

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून यंदाही शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वीच मेळाव्याची मागणी करणारे दोन्ही गटाचे अर्ज मुंबई महापालिकेच्या दप्तरी जमा झाले आहेत. त्यातच कितीही अडथळे निर्माण केले तरी आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे सांगत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर टीका केली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह अधिकृतपणे आमच्याकडे असल्याने शिवाजी पार्कात आमचाच मेळावा होणार, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला.

SCROLL FOR NEXT