Maharashtra Municipal Corporation Election Result 2026
मुंबई : "आम्ही जिद्दीने निवडणुकांना सामोरे गेलो. निकाल काय येतोय याची प्रतिक्षा करतोय. निकालानंतर मुंबई वाचवण्यासाठी, भाजपला रोखण्यासाठी जेजे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ," असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
सत्ताधारी लोकशाही मानत नाही मात्र आम्ही लोकशाही मार्गानं निकालाची वाट पाहतोय. जर ईव्हीएम मशिनमधून लोकांनी केलेलं मतदान गायब केलं नसेल तर आम्ही बहुमत मिळवू , असा विश्वास व्यक्त करत महापालिका आयुक्तांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या, सांगत तुतारीचं बटण दाबलं की कमळाला मत जाणं, अशा नेहमीच्याच तक्रारी आहेत, असेही ते म्हणाले.
आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालं आहे हे आकडे समोर आले नव्हते. आमची मागणी बॅलेटपेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी होती आहे. लोकांनी केलेले मतदान इव्हीएम मशीन मधून काढले नसेल तर आम्ही निवडणूक येऊ. कॉंग्रेसची मदत नक्की घेऊ, असे स्पष्ट करत महापौर आमचा बसवला जाऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
"मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं," असा सल्ला देतानाच संजय राऊतांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत वापरली जाणारी 'शाही' सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "शाई पुसली जाते हे आता निवडणूक आयोगानेही मान्य केलं आहे. जर निवडणूक प्रक्रियेत अशा त्रुटी राहत असतील, तर पारदर्शकतेचे काय?" असा सवाल त्यांनी केला.