Sanjay Raut On Ajit Pawar Canva Pudhari Image
मुंबई

Sanjay Raut On Ajit Pawar : दरोडेखोरीमुळंच पैशाचं सोंग करता येत नाहीये..... संजय राऊतांचा कर्जमाफीवर भडकलेल्या अजित पवरांना टोला

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या पैशाचं सोंग करता येत नाही या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला.

Anirudha Sankpal

Sanjay Raut On Ajit Pawar :

संजय राऊत यांनी आज (दि.२५) पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार हे बीड दौऱ्यावर असताना त्यांना एका युवकानं कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार यांचा पारा चढला. तसंच त्यांची जीभ देखील घसरली. यावरूनच संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या पैशाचं सोंग करता येत नाही या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, 'पैशाचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका, ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे. तुम्ही सारख लाडक्या बहिणांची उल्लेख करू नका लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेले आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणण्याची वेळी ही त्यांच्या दरोडेखोरीमुळं आलेली आहे. ९ ते १० लाख कोटी रूपयांचे कर्ज या राज्यावरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाहीये. हे लोक ६५ हजार कोटी रूपये व्याज भरतात. मराठवाड्यातील संकटातून कसा मार्ग काढणार... केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. शेतकऱ्यांनी कसं जगायचं

संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत असं सांगितलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरे लातूर पासून संभाजीनगर पर्यंत दौरा करणार आहेत. आम्ही कसा आवाज उठवता येईल. सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू. तो हे सर्व प्रश्न विचारेल म्हणून यांनी विरोधी पक्षनेता ठेवला नाही.'

शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. जे सरकार विरोधीपक्षनेता होऊ देत नाही त्या सरकारकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवायच्या असा सलाव देखील संजय राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT