Sanjay Raut Join BJP: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ संजय राऊत यांनी आता प्रथेप्रमाणं सकाळी पत्रकार परिषद घेतली. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत भाजपविरूद्ध आग ओकतानाच त्यांनी ते देखील भाजपमध्ये जाऊ शकतात असे विधान करून सर्वांना भूवया उंचावायला लावल्या.
नुकतेच भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपली यादी जाहीर केली. त्यातील लखानी यांच्या नावावर चर्चा सुरू असतानाच भाजपमध्ये स्वतःच असं काही नाही जे काही आहे ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं आहे. त्यांनी याचे उदाहरण देताना पश्चिम बंगालचे सध्याचे मुख्यमंत्री आणि आसामचे दोन वेळचे मुख्यमंत्री हे दोन्ही तृणमूल आणि काँग्रेस पक्षात होते याकडे लक्ष वेधले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बोलता बोलता जर मोदींनी विकास केला असं म्हणता तर मला मोदींच्या विकासाचा एक मुद्दा कोणी समजवून सांगितला तर मी देखील भाजपमध्ये जाईन. मोदींना असा असा विकास केला असं एकाने सांगावे. मी पंडित नेहरूंनी काय विकास केला, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी काय विकास केला हे सांगू शकतो.
राऊत पुढे म्हणाले, आमचे ज्यावेळी मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते त्यावेळी आम्ही काय विकास केला. बाळासाहेब ठाकरेंनी काय विकास केला हे सांगू शकतो असं म्हणत थेट भाजपला आव्हान दिलं. त्यांनी राज्यातील भाजप सरकारमध्ये अनेक नेते हे मूळचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेमधील आहेत असं सांगितलं.