राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन धावणार कधी? pudhari photo
मुंबई

SGNP toy train : राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन धावणार कधी?

पर्यटकांना प्रश्न, धावपट्टीचे साहित्य चोरीला गेल्याने सेवेला विलंब

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Gandhi National Park toy train

कांदिवली : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद असलेली मिनी टॉय ट्रेन नवीन रूपात पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. मात्र तपासणी सुरू असताना धावपट्टीचे साहित्य काही ठिकाणी चोरीला गेल्याचे दिसून आहे. त्यामुळे दिवाळीत सुरू होणारी ही सेवा सुरू झालेली नाही. पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1974 मध्ये मिनीट्रेन दाखल झाली. अल्पावधीतच ती पर्यटकांसह लहानग्यांची आवडती बनली होती. 2021 च्या तौक्ते वादळात ही सेवा बंद पडली असून अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

चार वर्षांनंतर ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी डिझेलवर धावणारी वनराणी आता चार डबे घेऊन विजेवर धावणार आहे. याचे काम आकृती इंटरप्रायजेस, एन्सी रेल आणि खोडलं कॉर्पोरेशन या कंपन्यांकडून सुरू आहे. त्यांच्याकडून रुळांची पाहणी सुरू असताना 29 ऑगस्ट रोजी फिटिंग आणि शटरिंगचे साहित्य चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. कंत्राटदार कंपनीने याबाबत उद्यानाचे उपसंचालक यांना पत्रव्यवहार करून कळविले.

उद्यान प्रशासनाने ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे. उद्यान प्रशासन आता टॉय ट्रेन मार्गाची सखोल तपासणी करत आहे. मात्र दिवाळीत सुरू होणारी सेवा आजतागायत सुरू झालेली नाही. लाखो पर्यटकांना आकर्षित करणारी वनराणी सुरू होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

एका महिन्यात कोणतीही चोरी झालेली नाही. टॉय ट्रेनचे काम प्रगतिपथावर आहे. चाचण्यादेखील यशस्वी झाल्या आहेत. लवकरच मिनी टॉय ट्रेन सेवेत रुजू होणार असल्याचे वन अधिकारी अनिता पाटील यांनी सांगितले.

  • कृष्णगिरी येथून सुटणाऱ्या वनराणीच्या मार्गाचे, रुळांचे तसेच मार्गातील कृत्रिम बोगद्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रूपातील आकर्षक वनराणीला नवीन डबे, नवीन आसनव्यवस्था असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT