मुंबई

समीर वानखेडेंच्या वडील, बहिणीची आज सीबीआय चौकशी

दिनेश चोरगे

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणात भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या लाचखोरीच्या आरोपांवरुन तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वानखेडेंच्या वडिल आणि बहिणीला चौकशीला पाचारण केले आहे.

या दोघांचीही मंगळवारी सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.  केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक असलेल्या समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

SCROLL FOR NEXT