पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हा संशयित अगदी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितासारखा दिसतो. मुंबई डीसीपी म्हणतात की, त्या व्यक्तीला नुकतेच पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. त्याच्यावर घरफोडीचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत आणि पोलिस त्याची चौकशी करत आहेत. 16 जानेवारीच्या रात्री मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी सैफ अली खानवर हल्ला झाला. खरंतर, एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफ-करीनाच्या घरात घुसला होता. सैफसोबत झालेल्या भांडणादरम्यान हल्लेखोराने त्याच्यावर अनेक वेळा हल्ला केला, त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसापूर्वी अभिनेता शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा देखील एकाने केला होता. अज्ञात इसमाने शाहरुखच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला घराच्या कंपाऊंडवर जाळी आसल्याने घुसण्यात अपयश आले. सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे.
16जानेवारीच्या रात्री एका चोराने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. चोराने जेहच्या खोलीत सैफवर चाकूने ६ वेळा वार केले होते. असे म्हटले जात आहे की त्याने नानीकडून 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. आया आणि चोर यांच्यात वादही झाला. जेव्हा सैफ दोघांमध्ये आला तेव्हा चोराने अभिनेत्यावर हल्ला केला. सैफला ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्याच्या मणक्यातून शस्त्राचा 2.5 इंचाचा तुकडा काढण्यात आला. आता तो धोक्याबाहेर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, ही घटना सैफ अली खानची मुले तैमूर आणि जेह यांच्या खोलीत घडली. हल्लेखोर आत कसा घुसला याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्लेखोर बाहेरून आला होता की आधीच आत होता हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. सैफच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 2.30 च्या सुमारास काही आवाज ऐकून आया (मुलांची काळजी घेणारी मदतनीस) जागी झाली. सैफ अलीचे संपूर्ण कुटुंब घरी झोपले होते. आवाज ऐकून सैफ अली खान जागा झाला आणि त्याने हल्लेखोराचा सामना केला. हाणामारीदरम्यान, हल्लेखोराने त्याच्यावर अनेक वेळा हल्ला केला आणि पळून गेला.