Sahil Wakode Case Pudhari
मुंबई

Sahil Wakode Case: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे; आझाद मैदानात विविध विद्यार्थी संघटना एकवटल्या

आझाद मैदानावर रविंद्र वाकोडे आणि सोनाली यांचे उपोषण १५ व्या दिवशी; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थी संघटनांचे आंदोलन.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पवई आयआयटीचा विद्यार्थी साहिलच्या मृत्युप्रकरणी केदारे व डुला यांना पोलिसांनी अटक करावी, या मागणीसाठी वडील रविंद्र वाकोडे व साहिलची आई सोनाली आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.

शुक्रवारी उपोषणाचा १५ वा दिवस होता. साहिलच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आता विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या असून त्यांनी शुक्रवारी आंदोलन केले.

या वेळी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, 'आमची पढाई, आमची लढाई ' मुंबई अगेन्स्ट सप्रेशन ऑफ स्टुडंट्स आणि या संघटनांनी भेट देत सहभाग घेतला होता. साहिलच्या मृत्युला आयआयटी मुंबई संचालक शिरीष केदारे व प्रा. सुर्यनारायण डुला जबाबदार आहेत.

साहिलच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, मुंबई पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करावी अशी मागणी या वेळी संघटनांनी केली.

मी याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु आहे, असे मला सांगितले. सध्या तरी याचठिकाणी उपोषणाला बसणार आहे. माझा हा लढा सुरुच राहिल.
- रविंद्र वाकोडे, साहिलचे वडिल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT