मुंबई : आझाद मैदानात उपोषणाला बसलेले साहिलचे आई-वडील आणि त्‍यांना सहकार्य करणारे ॲड. सिद्धार्थ इंगळे, ॲड. साम्या कोरडे. pudhari photo
मुंबई

Sahil Wakode Death Case : साहिलच्या मृत्‍यूप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

वडील रवींद्र वाकोडे यांची मागणी; आझाद मैदानातील उपोषणाला २१ दिवस पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : माझा मुलगा साहिलच्या मृत्युप्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी रवींद्र वाकोडे यांनी आझाद मैदानात २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

आयआयटीच्या वसतीगृहात साहिलचा १८ सप्टेंबर २०२६ ला गळफासाने मृत्यू झाला. माझ्या मुलाच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली. त्यावेळी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा यांनी दोन दिवसांत संशयित आरोपींना अटक करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र; अद्यापपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही.

या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी आम्हाला तपासाची कोणतीही माहिती देत नाही. मुंबई पोलीस प्रशासनाकडे तपास अधिकारी बदला, अशी मागणी करतो आहे. पण; त्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT