मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी (दि. 31) राज्य सरकारने यासंदर्भात आदेश जारी केले. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्याजागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 3 जानेवारीला ते पदभार स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.
1990 बॅचचे अधिकारी असलेले दाते हे मूळचे पुण्याचे आहेत. मुंबईत 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी दहशतवादी अजमल कसाब याचा धैर्याने सामना केला होता. ते सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ‘एनआयए’चे प्रमुख आहेत. ‘एनआयए’चे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे यशस्वीरीत्या हाताळली आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यकठोर अधिकारी अशी त्यांची पोलिस दलात ओळख आहे.