Sada Sarvankar
मुंबई : सध्या आमदार असलेल्यांना २ कोटी मिळतात, पण मी आमदार नसताना २० कोटी मिळत आहेत, पराभूत होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत, असं वक्तव्य माजी आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे. आमदारांनी अनेकवेळा निधीबद्दल तक्रारी केल्या असताना आता सरवणकर यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
सरवणकर म्हणाले की, मी आमदार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. दादर असो किंवा कुठेही असो माझी काम आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी काम केली. पण काम केल्याने पराभव होतो, हा माझा अनुभव आहे. काम न करणारे जिंकून येतात, तेही फक्त जाती पातीवर जिंकून येतात, असं ते म्हणाले.
मी कधीच पराभूत झालो असं वाटलं नाही कारण तुमच प्रेम हे कायम आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो मी पराभूत जरी झालो असलो तरी आपलं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेब माझ्या पाठीशी सक्षम आहेत. आमदार असलेल्यांना २ कोटी मिळतात. पण मी आमदार नाही तरीही मला २० कोटी रूपये मिळतात. म्हणूनच मी सगळीकडे उद्घाटन करताना दिसतोय, कारण आपला पिंड हा कामाचा आहे, असे सरवणकर म्हणाले.