Rupali Chakankar file photo
मुंबई

Rupali Chakankar: रूपाली चाकणकरांच्या बोटाला झालेल्या जखमेमागचं खरं कारण आलं समोर; पाहा Video

Ashok Kharat case: रूपाली चाकणकर यांची पाठराखण करत त्यांच्या बोटाला जी जखम झाली आहे ती दरवाजा लागून झाल्याचा दावा पुण्याच्या धायरी मधल्या कार्यकर्त्याने केला आहे.

मोहन कारंडे

Rupali Chakankar Ashok Kharat case

मुंबई: "रुपाली चाकणकर तंत्र मंत्र विद्या करायच्या, त्यातूनच त्यांनी स्वत:ची अनामिका कापली होती," असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केले होते. अंधारे यांच्या या आरोपांना चाकणकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. धायरी मधल्या ज्या मंडळाच्या गणपतीची आरती करण्यासाठी गेल्या होत्या, त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ पोस्ट करून चाकणकर यांनी गाडीतून उतरत असताना दरवाजामध्ये बोट अडकल्याने जखम झाल्याचा दावा केला आहे.

रूपाली चाकणकर यांची पाठराखण करत त्यांच्या बोटाला जी जखम झाली आहे ती दरवाजा लागून झाल्याचा दावा पुण्याच्या धायरी मधल्या कार्यकर्त्याने केला आहे. त्यांचे चुकीच्या पद्धतीने फोटो सोशल मीडियावर दाखवले जात आहेत, असा देखील आरोप या कार्यकर्त्याने केला आहे.

रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?

कार्यकर्त्याचा व्हिडिओ पोस्ट करून त्याच्या कॅप्शनमध्ये चाकणकर यांनी लिहिले आहे की, "गेली वीस बावीस वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तशतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली,वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्तातच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत, हे आवर्जून सांगतात."

"खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच," असे चाकणकर यांनी लिहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT