Big Breaking | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 
मुंबई

Big Breaking | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सादर केला राजीनामा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले राजिनाम्याचे पत्र

Namdev Gharal

Rupali Chakankar resignation भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आरोप होत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज दिला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्‍यांनी राजिनामा सोपविला. आज 20 मार्च रोजी त्‍यांनी पवार यांची भेट घेत आपल्या पदाचा राजिनामा सादर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात त्‍यांनी वैयक्तिक कारणांने व स्वेच्छेने राजिनामा सोपवत आहे असे नमूद केले आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्‍यांची राज्य महिला अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली होती.

दरम्यान नाशिक येथील भोंदू बाबाचे अश्लिल कारनामे उघड होत आहेत. तसेच अनेक चित्रफितीही समोर येत आहेत अशात चाकणकर या खरात यांच्या भक्त होत्‍या. ही बाब समोर आली आहे. महिलांच्या लैगिंक शोषणप्रकरणात अटक झालेला खरात याच्या भक्तच महिला आयोगाच्यास अध्यक्षा असल्यामुळे सर्वच स्तरातून त्‍यांच्यावर टीक होत होती. व राजिनाम्याचा दबाब वाढला होता.

दरम्यान शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेचा हवाला देत रूपला चाकणकर या स्वतः तंत्र मंत्र विद्या करत होत्या असा दावा केला होता. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्‍या रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या होत्‍या, 'एका पीडितेने सांगितलं की रूपालीताई चाकणकर या स्वतः तंत्र मंत्र विद्या करत होत्या. त्यांनी स्वतःची अनामिका देखील कापली होती. आता ही अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहिती नव्हतं.'

अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. त्‍यातच चाकणकर या खरात याच्या अनुयायी असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्‍या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असल्याने पक्षाचीही प्रतिमा मलिन होत होती. यातूनच त्‍यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT