मुंबई ःराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक ‘संघ यात्रेची शंभर वर्षे : नवे क्षितिज’ असा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देशभरातील चार महानगरांत आयोजित करण्यात आला होता. यापैकी एक कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मीडियातून केवळ दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव हे विशेष निमंत्रित होते. दि. 8 रोजी सकाळी चहापानादरम्यान डॉ. जाधव यांनी मोहन भागवत यांच्याशी संवाद साधला.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे प्रमुख आशिष चौहान, उद्योगपती राधाकिशन दमानी, हर्षल गोयंका, सज्जन जिंदाल, अजय पिरामल, कुमार मंगलम बिर्ला, एल अँड टीचे एस. सुब्रमण्यम, एचडीएफसी बँकेचे शशीधर जगदीशन, मोर्गन स्टॅनलेचे रिदम देसाई, अभिनेते सलमान खान, अभिनेत्री हेमामालिनी, दिग्दर्शक बोनी कपूर, ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल, पार्श्वगायक अदनान सामी, अभिनेते अक्षय कुमार, विकी कौशल, अभिनेत्री अनन्या पांड्ये, पंडित हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार प्रितम, करण जोहर, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, सुबोध भावे, रूपाली गांगुली, अक्षय विधानी, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर, वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, डॉ. श्रीकर परदेशी व विवेक भिमनवार, रणबीर कपूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जी. डी. यादव, रोनी स्क्रूवाला, विनित जैन, सुभाष चंद्रा, नितेश तिवारी, मोहित सुरी, रमेश तौराणी, सुभाष घई, ओम राऊत, इंदरकुमार, प्रसाद ओक, मनोज जोशी, ऋषिकेश जोशी, प्रसाद बर्वे, निवृत्त पोलिस अधिकारी प्रवीण दीक्षित, अतुलचंद्र कुलकर्णी, डी. के. शिवानंदन व विवेक फणसळकर यांच्यासह इटली, इस्रायल, इतर देशांच्या राजदूतावासांचे अधिकारी तसेच उद्योगपती, चित्रपट सृष्टीतील मान्यवर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, कायदे पंडित, सामाजिक संस्थांचे सदस्य, क्रीडापटू, धर्मगुरू, लेखक आदी निवडक निमंत्रित उपस्थित होते.
भागवत यांचे मान्यवरांशी चहापान आणि संवाद
संघ शताब्दीनिमित्त दोन दिवसांचा हा कार्यक्रम मुंबईत वरळी येथे नेहरू सेंटरच्या सभागृहात पार पडला. दि. 7 व 8 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 7 रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण झाले तर दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी याच ठिकाणी या निवडक मान्यवर निमंत्रितांशी चहापान करीत विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्रातील माहिती करून घेतली तसेच सध्या होत असलेल्या त्या त्या क्षेत्रातील बदलाबाबत भागवत यांनी त्यांच्याशी चर्चा केली.