Rohit Pawar on Nashik MLC Election : "कालपर्यंत एकनाथ शिंदे 'ऑपरेशन टायगर'च्या बाता मारत होते; पण नाशिकचा निकाल पाहिला तर वाघाची म्हणजेच शिकारीचीच शिकार झाली आहे," अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव बोलताना त्यांनी महायुती सरकारव हल्लाबोल केला
सत्ताधारी महायुतीने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. आज जाहीर झालेल्या १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान झाले होते. मात्र, मतदानापूर्वीच महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला सुरुवातीलाच आघाडी मिळाली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) सर्वाधिक ११ जागा मिळाल्या, तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला २ जागांवर विजय मिळाला. नाशिकमधील महायुतीच्या अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी पराभव केला. गिते यांचा हा विजय या मतदारसंघात शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
'एएनआय'शी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "कालपर्यंत एकनाथ शिंदे 'ऑपरेशन टायगर'चे समर्थन करत होते, पण नाशिकचा निकाल पाहता शिकारी स्वतःच शिकार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे."
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याविरोधात २९ जून रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कर्जमाफी प्रश्नी सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरूच ठेवू. या सरकारवर आमचा अजिबात विश्वास नाही," असे पवार म्हणाले.
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: शिवसेनेकडून रवींद्र फाटक (ठाणे) आणि दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ), राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आणि विक्रम काकडे (पुणे), तर भाजपकडून अरुण लखाणी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) आणि प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर). भाजपचे विजयी उमेदवार: सुहास शिरसाट (छत्रपती संभाजीनगर-जालना), अविनाश ब्राम्हणकर (भंडारा-गोंदिया), धैर्यशील कदम (सांगली-satara), राजेंद्र राऊत (सोलापूर), बसवराज पाटील (धाराशिव-लातूर-बीड), राजीव पोतदार (नागपूर), नंदकिशोर महाजन (जळगाव), प्रवीण पोटे (अमरावती) आणि अमर राजूरकर (नांदेड) यांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे सय्यद खान परभणी-हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले. या निकालांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.