पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishi Sunak Mumbai Visit | ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मुंबईत रविवारी टेनिस बॉल क्रिकेटने खेळण्याचा मोह आवरला नाही. दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला भेटीदरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील काल झालेल्या पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमलाही भेट दिली.
१८८५ मध्ये सर जमशेदजी जेजीभॉय आणि चेअरमन जमशेदजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला पारसी जिमखाना मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मरीन ड्राइव्हच्या काठावर वसलेल्या या क्लबने क्रिकेटपटूंच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी हे एक आदरणीय ठिकाण आहे. ऋषी सुनक यांनी रविवारी मुंबईला भेट दिली. यावेळी त्यांना पारसी जिमखान्यात टेनिस बॉल क्रिकेटने खेळण्याचा मोह आवरला नाही. क्रिकेट खेळातानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबईचा प्रवास पूर्ण होत नाही,' असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
यावेळी सुनक यांनी सांगितले की, पारसी जिमखाना क्लबच्या वर्धापन दिन सोहळ्यात तुम्हा सर्वांसोबत असणे खूप छान होते. आज सकाळी क्रिकेट खेळताना बराच वेळ मी आऊट गेलो नाही, असे ते म्हणाले.