Rice Price increase | बासमतीसह पाच प्रकारचा तांदूळ महागला! file photo
मुंबई

Rice Price increase | बासमतीसह पाच प्रकारचा तांदूळ महागला!

दरात 1.5 ते 27.5 टक्क्यांनी वाढ : पंजाब, हरियाणामध्ये उत्पादन घटले

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई : उत्पादन घटल्याने बासमती तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे दर घाऊक बाजारात 32 रुपयापासून 100 रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात 120 ते 200 रुपयांवर पोहोचले आहेत. नियमित बासमती तांदळासह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या दरात वाढ झाली असून हे सहा प्रकारचे तांदुळ क्विंटलमागे दीड ते साडेसत्तावीस टक्क्यांनी वाढले.

5 नोव्हेंबर 2025 ते 1 एप्रिल 2026 म्हणजेच सहा महिन्यांत बासमतीसह या पाच प्रकारच्या तांदळाच्या दरातील ही मोठी दरवाढ आहे. सर्वाधिक दरवाढ बासमती, तिबार, कोलम या जातीच्या तांदळामध्ये झाली आहे. बासमती तांदळाला जगभरातून मोठी मागणी आहे. इराण आणि आखाती देशात बासमती सर्वाधिक निर्यात केला जातो. भारतातून गेल्यावर्षी सुमारे 40 लाख टन बासमतीची निर्यात झाली.

मुंबई एपीएमसीत सुमारे 50 जातीच्या तांदळाची आवक होते. त्यापैकी 25 जातींच्या तांदळाला चांगली मागणी आहे. एपीएमसी घाऊक बाजारात जून 2021 मध्ये बासमती 95 ते 100 रुपये किलो तर जून 2022 मध्ये 85 ते 90 रुपये किलो होता. मात्र सप्टेंबर 2023 च्या सुरुवातीपासून बासमतीचा दर 100 ते 110 रुपयांवर पोहोचला. तो आजही कायम आहे.

पंजाब, हरियाणा या राज्यांतून मुंबई एपीएमसीत दररोज 150 टन बासमती तांदुळांची आवक होते. तर इतर जिल्ह्यांतील व्यापारीही 200 टनाच्या जवळपास बासमती थेट याच राज्यांतून मागवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT