मुंबई

सीमाप्रश्नी मंगळवारी विधानसभेत ठराव मांडणार : एकनाथ शिंदे

अविनाश सुतार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : सीमाप्रश्नी मंगळवारी (दि. २७) विधानसभेत ठराव मांडला जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे केले. केंद्र सरकारतर्फे आयोजित वीर बालदिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, सीमाप्रश्नाविषयी मंगळवारी ठराव मांडला जाणार आहे. सीमाप्रश्नाच्या आंदोलनामध्ये मी तुरूंगवास भोगला आहे. त्यामुळे सीमावासियांच्या योजना बंद करणाऱ्यांनी सरकारला शिकवू नये. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला होता. त्याचप्रमाणे आज वीर बाल दिवस होता, दोन लहान मुलांच्या बलिदानाचा दिवस आज केंद्र सरकारने आयोजित केला होता. गुरुगोविंद सिंग आणि महाराष्ट्र, पंजाब यांचे जवळचे नातं आहे. त्यामुळे मला या कार्यक्रमाला बोलावले होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट घेतली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT